Naturally ripened bananas: केमिकलने पिकवलेली केळी कशी ओळखायची? जाणून घ्या ५ सोपे मार्ग

Surabhi Jayashree Jagdish

सालीवरील ठिपके तपासा

केळीची साल पूर्णपणे गुळगुळीत आणि डागरहित पिवळी असल्यास ती नेहमीच नैसर्गिकरीत्या पिकलेली असेल असं नाही. नैसर्गिकरीत्या पिकलेल्या केळ्यांच्या सालीवर लहान तपकिरी किंवा काळे ठिपके दिसणं ही सामान्य बाब आहे आणि त्यावेळी केळ्यामध्ये नैसर्गिक गोडवा अधिक असतो.

Chemically ripened bananas | saam tv

हलके दाब देऊन बघा

केळं बोटांनी हलकंच दाबून तपासा. खूपच कडक वाटणारे केळं आतून पूर्णपणे पिकलेलं नसण्याची शक्यता असते, तर नैसर्गिकरीत्या पिकलेले केळे किंचित मऊ वाटते. मात्र खूपच पिचपिचीत किंवा जास्त मऊ केळे घेणं टाळा.

Artificially ripened bananas | saam tv

केळ्याच्या देठाचा रंग पाहा

केळ्याचा वरचा देठ आणि फळाचा रंग एकसारखा आहे का, हे तपासा. जर केळं पूर्ण पिवळं दिसत असलं आणि देठ मात्र गडद हिरवा असेल तर ते आतून पूर्णपणे पिकलेलं नसण्याची शक्यता असते.

How to identify ripe bananas | saam tv

सुगंधावरून ओळखा

पिकलेल्या केळ्याला नैसर्गिक गोड आणि फळासारखा सुगंध येतो. केळ्याचा वास घेतल्यास हा फरक सहज लक्षात येऊ शकतो. जर कोणताही सुगंध जाणवत नसेल किंवा कच्च्या पानांसारखा वास येत असेल, तर केळं पूर्णपणे पिकलेलं नसण्याची शक्यता असते.

Fresh bananas | saam tv

केवळ रंगावर विश्वास ठेवू नका

एकसारखा गडद पिवळ्या रंगाची सर्वच केळी नैसर्गिकरीत्या पिकलेली असतील असं नाही. नैसर्गिक पिकण्याच्या प्रक्रियेत रंग आणि सालीवरचे ठिपके यामध्ये थोडाफार फरक दिसून येतो.

Banana aroma | saam tv

महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा

बाजारात विकली जाणारी काही केळी नियंत्रित पद्धतीने इथिलीन वायूच्या साहाय्याने पिकवली जातात. ही पद्धत योग्य नियमांनुसार वापरल्यास सुरक्षित मानली जाते. मात्र बंदी असलेल्या कॅल्शियम कार्बाइडसारख्या रसायनांचा वापर आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो.

Banana texture | saam tv

टीप

ही माहिती विविध उपलब्ध स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य जनजागृतीच्या उद्देशाने देण्यात आली आहे. कोणतेही फळ केमिकलने पिकवले आहे की नाही, याची आम्ही स्वतंत्रपणे खात्री करत नाही. खरेदीपूर्वी आवश्यक ती पडताळणी करूनच निर्णय घ्यावा.

Natural fruit ripening | saam tv

Liver Cancer: लिव्हरमध्ये कॅन्सरची गाठ तयार होत असताना पायांमध्ये दिसतात ही 3 विचित्र लक्षणं

Swollen Legs | saam tv
येथे क्लिक करा