Dhanshri Shintre
स्वयंपाकघरात लाल मिरची पावडर असणं अपरिहार्य आहे. याशिवाय, जेवण अधिक चविष्ट करण्यासाठी लाल मिरची पावडरचा नियमित वापर केला जातो.
अन्नाची चव वाढवण्यासाठी मसाल्यांचा वापर अत्यावश्यक मानला जातो. विविध मसाले जेवणाला अधिक चविष्ट बनवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात.
मसाल्यांमध्ये भेसळीचा धोका कायम असतो, ज्यात लाल मिरची पावडरचाही समावेश होऊ शकतो. त्यामुळे मसाले खरेदी करताना काळजी घेणे गरजेचे आहे.
लाल मिरची पावडरमध्ये भेसळ झाल्याचे कसे ओळखायचे याबाबत महत्त्वाची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
लाल मिरची पावडरमध्ये भेसळ आहे का, हे तपासण्यासाठी ती पाण्यात टाका. पाण्याचा रंग बदलल्यास भेसळ असल्याचे निश्चित मानावे.
लाल मिरची पावडर आयोडीन सोल्यूशनमध्ये टाका. जर तिचा रंग निळा झाला तर त्यामध्ये भेसळ असल्याचे स्पष्ट होते.