Manasvi Choudhary
एलपीजी गॅस स्वयंपाक बनवण्यासाठी घराघरात वापरला जातो. अनेक रेस्टॉरंट हॉटेलमध्ये देखील वापरतात.
एलपीजी गॅस हा अत्यंत ज्वलनशील आहे. त्यामुळे गॅस वापरताना योग्य काळजी ग्या.
गॅस गळत असेल तर तुम्ही कोणती पाऊले उचलली पाहिजे हे जाणून घ्या.
एलपीजीमध्ये ओझोनयुक्त गंध असल्याने गॅसचा वास आला किंवा सिलिंडजवळ वाफ दिसली तर गॅसचा वापर करणे टाळा.
गॅसचा वास आल्यास घरातील सर्व दारे आणि खिडक्या त्वरित उघडा जेणेकरून गॅस बाहेर निघून जाईल.
माचिस, लायटर, मेणबत्ती किंवा अगरबत्ती अशा सर्व गोष्टींचा वापर करणे त्वरित थांबवा.
कोणताही स्विच चालू किंवा बंद करू नका. इलेक्ट्रिक स्पार्कमुळे आग लागण्याची शक्यता असते.
सिलिंडरचे बटण बंद करून त्यावर सुरक्षित कॅप लावा. सिलिंडर इतर ठिकाणी नेताना सावधगिरी बाळगा