झाडूसारखे केस होतील सिल्की! फक्त २० रूपयात घरीच बनवा 'हा' नॅचरल हर्बल शॅम्पू

Manasvi Choudhary

होममेड शॅम्पू

महागडे शॅम्पू आणि कंडीशनर केसांची निगा राखते असा अनेकांचा समज आहे. मात्र तुम्हाला माहितीये का घरच्या घरी नैसर्गिकरित्या तयार केलेला शॅम्पू केसांसाठी अधिक फायदेशीर आहे.

Homemade Shampoo

केसांच्या समस्या

केस गळणे, कोरडेपणा आणि अकाली पांढरे होणे या समस्यांवर जुन्या काळातील नैसर्गिक आणि घरगुती शॅम्पू वापरायचे.

Herbal Hair Wash Tips

साहित्य

केसांसाठी घरगुती शॅम्पू बनवण्यासाठी तुम्हाला आवळा पावडर, शिकेकाई पावडर, जास्वदांची पावडर, रीठा पावडर, मेथी पावडर, कोरफड आणि पाणी हे साहित्य घ्यावे लागणार आहे.

Homemade Shampoo

पावडर एकत्र करा

एका लोखंडाच्या किंवा काचेच्या भांड्यात आवळा, शिकेकाई, जास्वंद, रिठा, मेथी आणि कोरफडीचे तुकडे किंवा पावडर एकत्र करून पाण्यात रात्रभर भिजत घाला.

Amla Shikakai Reetha Benefits

मिश्रण उकळून घ्या

सकाळी हे मिश्रण गॅसवर ठेवून मंद आचेवर चांगले उकळून घ्या. मिश्रण थोडे घट्ट झाल्यावर गॅस बंद करा.

Amla Shikakai Reetha Benefits | Pintrest

घरगुती शॅम्पू तयार

हे मिश्रण संपूर्णपणे थंड होऊ द्या. त्यानंतर हाताने चांगल्या प्रकारे कुस्करून एका स्वच्छ कापडाने किंवा गाळणीने गाळून घ्या. अशाप्रकारे घरगुती शॅम्पू तयार होईल.

Amla Shikakai Reetha Benefits

शॅम्पू कधी लावायचा?

१) नॅचरल शॅम्पू केसांच्या मुळांवर लावा आणि बोटांच्या साहाय्याने हलक्या हाताने २ ते ३ मिनिटे मसाज करा. रिठ्यामुळे या शॅम्पूला नैसर्गिक फेस येतो, जो केसांमधील घाण साफ करतो.

Amla Shikakai Reetha Benefits

२) मसाज केल्यानंतर २ ते ३ मिनिटांनी केस कोमट पाण्याने स्वच्छ धुवा आणि मऊ टॉवेलने कोरडे करा.

३) आठवड्यातून २ ते ३ वेळा तुम्ही हा सोपा उपाय घरी करा यामुळे केसांची वाढ मुळापासून होईल.

Homemade Shampoo

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: टॉयलेट आणि वॉशरूममध्ये फरक काय? दोन्ही एकच की वेगवेगळे?

Toilet And Washroom
येथे क्लिक करा..