Manasvi Choudhary
आजकाल खाण्यापिण्याच्या सवयींमुळे केवळ आरोग्यावरच नाही तर दातांवर देखील परिणाम होतो. चहा, कॉफी, विविध पदार्थ यांच्या सेवनामुळे दात देखील पिवळे होतात. दातांवरची चमक कमी होते.
अनेकजण यावर उपाय म्हणून महागड्या दातांच्या ट्रिंटमेंट घेतात मात्र आज आम्ही सोपे घरगुती उपाय सांगणार आहोत.
बदाम चावून खाल्ल्याने लाळ तयार होते जी दात स्वच्छ करण्यास महत्वाची भूमिका बजावते यामुळे तोंडातील बॅक्टेरिया देखील कमी होतात.
अननसमधील ब्रोमेलेन नावाचे एन्झाइम दातांवरील डाग काढून टाकण्यास मदत करते. हिरड्यांची सूज कमी करते.
संत्री, लिंबू आणि किवी या फळांचे सेवन केल्याने लाळ तयार होते यामुळे तोडांतील जिवाणू कमी होतात. दात नैसर्गिकरित्या स्वच्छ होतात.
कच्चे गाजर खाल्ल्याने दातांवरील घाण साफ होण्यास मदत होते. गाजर नैसर्गिक टूथब्रश सारखे काम करते.
बेकिंग सोडा आणि लिंबू ही पेस्ट दाताला लावल्यास दात स्वच्छ होतील. आठवड्यातून १ ते २ वेळा तुम्हा हा उपाय करू शकता.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.