Saam Tv
केसांच्या टोकांना दोन किंवा अधिक फाटे पडणे म्हणजे स्प्लिट एडंस. उष्णता, केमिकल्स, प्रदुषण आणि योग्य काळजी न घेतल्याने ही समस्या वाढू लागते.
दर ६ ते ७ आठवड्यांनी केसांची ट्रिमिंग करावे.फाटलेली टोके कापून टाकावी. केस अधिक निरोगी दिसतील.
स्ट्रेटनर, कर्लर किंवा ब्लो ड्रायरचा जास्त वापर केल्याने केस कोरडे होतात. मग स्प्लिट एंड्स वाढू शकतात. त्यामुळे गरज असेल तेव्हाच वापर करा.
आठवड्यातून एकदा डिप कंडिशनिंग किंवा हेअर मास्क वापरा. नारळाच्या तेलाने किंवा बदामाच्या तेलाने मालिश केल्याने केसांना ओलावा देता येतो.
ओले केस कमकुवत असतात. मोठ्या दातांच्या कंगव्याने हळूहळू केस विंचरा. केस केव्हाही जोरात खेचून विंचरू नका.
केसांना वेळेवर मालिश करून तेल लावावे. तेल लावल्याने केस कोरडे पडत नाहीत . मग त्यांना फाटे फुटण्याची शक्यता देखील कमी असते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.