Manasvi Choudhary
महिलांप्रमाणेच पुरूषांच्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात. पुरुषांच्या शरीरातील एंड्रोजन' हार्मोन्समुळे तेल ग्रंथी वाढते यामुळे पुरुषांच्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात.
पिंपल्स आल्यानंतर तुम्ही जर त्याकडे दुर्लक्ष करत असाल तर हे गंभीर आहे. पिंपल्समुळे त्वचेवर काळे- लाल डाग येणे, जळजळ होणे, त्वचा लाल होणे या समस्या उद्भवतात.
पिंपल्सच्या त्रासापासून सुटका करण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय करणे महत्वाचे आहे.
जास्त तेलकट, जंक फूड, आणि साखरयुक्त पदार्थांमुळे शरीरात उष्णता वाढते आणि पिंपल्स येतात. आहारात फळे आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा. व्हिटॅमिन सी युक्त पदार्थांचे सेवन अधिक करा.
शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी दिवसभरात जास्तीत जास्त पाणी प्या. संपूर्ण दिवसात ६ ते ७ ग्लास पाणी प्या.
कडुलिंबामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. कडुलिंबाची पाने वाटून त्यात चिमूटभर हळद मिक्स करा आणि पिंपल्सवर लावा. १५ मिनिटांनी चेहरा धुवून घ्या.
पिंपल्सना वारंवार हात लावणे किंवा ते नखांनी फोडणे असे करणे टाळा यामुळे चेहर्यार डाग येऊ शकतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.