Saam Tv
शरीरावर कोणत्याही भागात असलेले केस स्त्रियांच्या सौंदर्यात अडचण आणतात. मग ते केस काढण्यासाठी अनेक उपाय करत असतो. काही घरगुती उपाय करून चेहऱ्यावरचे केस काढता येतील.
साखर, लिंबाचा रस आणि थोडे पाणी एकत्र करून गरम करा. मिश्रण कोमट झाल्यावर ते चेहऱ्याला लावून हळूहळू चोळून केस काढा.
कच्च्या पपईचा गरात हळद घालून चेहऱ्यावर 15 मिनिटे मसाज करा. पपईत असणाऱ्या पॅपेन एन्झाईममुळे केस मुळांपासून कमजोर करते.
बेसनात थोडी हळद आणि दूध मिसळा. मग ही पेस्ट चेहऱ्याला 15 ते 20 मिनिटे लावा . व्यवस्थित सुकल्यावर रेझरच्या मदतीने केस काढा. हा पॅक लावल्याने केस काढल्यानंतर चेहरा मऊ राहण्यास मदत होईल
बेसन आणि दही एकत्र करून पेस्ट तयार करा. 15- 20 मिनिटे चेहऱ्याला हलक्या हाताने काढा. यामुळे त्वचा एक्सफोलिट होण्यास मदत होईल.
योग्य प्रमाणात मिश्रण तयार करून नीट ढवळून घ्या. हे मिश्रण थोडं गरम आणि चिकट असू द्या. कोमट झाल्यावर केसांवर लावा आणि त्यावर कापडी पट्टी दाबून घ्या. हलकासा दाब देत काही वेळानंतर पट्टी विरूद्ध दिशेला ओढा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.