Manasvi Choudhary
शॉर्ट ड्रेसेस, वनपीस किंवा स्कर्ट परिधान करणे प्रत्येक मुलीला आवडते; पण अनेकदा गुडघ्यांवरील काळेपणामुळे मुली आवडीचे कपडे घालणे टाळतात किंवा संकोच करतात.
आपण चेहऱ्याची जितकी काळजी घेतो, तितकेच आपल्या हाता-पायांच्या त्वचेकडे लक्ष देणे महत्वाचे आहे.
जमिनीवर किंवा लादीवर गुडघे टेकून बसणे, त्वचेचे होणारे घर्षण, कोरडेपणा आणि साचलेली मृत त्वचा ही गुडघे काळे होण्याची मुख्य कारणे आहेत.
जर तुम्हालाही या समस्येपासून सुटका हवी असेल, तर महागड्या पार्लर ट्रिटमेंटपेक्षा काही सोपे घरगुती उपाय करून तुम्ही तुमचे गुडघे मऊ आणि चमकदार बनवू शकता.
अनेक जण फक्त चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावतात आणि गुडघ्यांकडे दुर्लक्ष करतात. गुडघ्यावरील त्वचेवर मॉइश्चरायझर लावल्याने त्वचा मऊ होते.
गुडघ्यांवर साचलेली मृत त्वचा जोपर्यंत निघत नाही, तोपर्यंत तिथला रंग उजळणार नाही. यासाठी आठवड्यातून १ ते २ वेळा गुडघ्यांना स्क्रब करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
गुडघ्यांचा काळेपणा वाढू नये म्हणून केवळ हाता-पायांची काळजी घेणे पुरेसे नाही, तर उन्हामुळे होणाऱ्या टॅनिंगपासूनही बचाव करा. बाहेर जाताना पुर्ण कपडे परिधान करा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.