Manasvi Choudhary
आरोग्याप्रमाणे केसांची काळजी घेणे महत्वाचे आहे. उन्हाळ्यात केसांच्या अनेक समस्या डोकं खातात. बदलती जीवनशैली, केमिकल उत्पादने यामुळे केसांना फाटे फुटतात, केस तुटतात.
उन्हाळ्यात केस गळण्याची समस्या उद्भवते तसेच केसांना फाटे देखील फुटतात यामुळे केसांची काळजी कशी घ्यायची हे जाणून घ्या.
केस धुण्यासाठी सल्फेट- मुक्त सौम्य शॅम्पूचा वापर करा यामुळे केसांमध्ये नैसर्गिक ओलावा टिकून राहतो.
ओले केस नाजूक असतात यामुळे ते सहज तुटतात केसांना शॅम्पू केल्यानंतर जोरात घासू नका ते व्यवस्थित कोरडे करा.
केस धुतल्यानंतर केसांना डीप कंडीशनिंग मास्क लावल्याने केस मऊ होतील.
रात्री झोपताना कापसाच्या उशीऐवजी सिल्क किंवा सॅटिनच्या उशीचे कव्हर वापरा यामुळे केस तुटत नाही.
केसांना सारखे ब्लिच करू नका. तसेच पर्मिंग किंवा कर्ल्स या ट्रिटमेंटसमुळे केसांना फाटे फुटतात.