ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तोंडातून वास येतोय असे बरेचजण तक्रारी करत असतात.
अनेक उपाय करुन तोंडातील दुर्गंधी काही जात नाही.
मात्र आम्ही सांगत असलेल्या घरगुती उपायांनी तोंडातील दुर्गंधी घालवता येईल.
एक लवंग देखील तोंडात ठेवल्याने तोंडातील दुर्गंधी घालवता येते.
दररोज सकाळी लिंबू पाण्यानी गुळण्या केल्याने तोंडातील दुर्गंधी घालवता येते
ब्रश करताना टुथपेस्टसोबत बेकिंग सोड्याचा वापर केल्याने तोंडाची दुर्गंधी कमी होण्यास मदत होते.
तुळशीची पाने खाल्ल्याने तोंडाची दुर्गंधी कमी होण्यास मदत होते.
इलायचीच्या सेवनानेही तोंडाची दुर्गंधी कमी होण्यास मदत होते
बडीशेप दररोज खाल्लाने तोंडातील दुर्गंधी घालवता येते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.