Manasvi Choudhary
आजकाल ऑफिसमध्ये सतत बसून काम केल्यामुळे पाठदुखीच्या समस्याचा त्रास उद्भवत आहे. महिलासह पुरूषांना हा त्रास होतो आहे. पुरूषांना सतत वाहन चालवून देखील पाठदुखीचा त्रास होतो.
पाठदुखीपासून नैसर्गिकरित्या सुटका मिळवण्यासाठी तुम्ही नियमितपणे योगा करणे महत्वाचे आहे.
मांजर-गाय योगा हे पाठीच्या कणाला लवचिक बनवते. गुडघे आणि हातांवर शरीराचा भार देऊन जमिनीवर टेबल सारखे उभे राहून हा योगा करावा.
श्वास घेताना पोट खाली झुकवा आणि वर पहा. श्वास सोडताना पाठ वरच्या बाजूला कमानदार करा आणि हनुवटी छातीला लावा
ज्यांना कंबरदुखी किंवा मणक्याचा त्रास आहे त्यांनी भुजंगासन करणे योग्य आहे. पोटावर पालथे झोपा. दोन्ही हात छातीपाशी ठेवून हळूहळू शरीराचा पुढचा भाग नाभीपर्यंत वर उचला. डोके आकाशाकडे ठेवा.
अधोमुख श्वानासन हा योगा केल्याने शरीर संपूर्ण स्ट्रेच होते हा व्यायाम जमिनीवर पालथे पडून हात आणि पायांच्या सहाय्याने शरीराला 'V' आकारात वर उचला. टाचा जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा आणि नजर नाभीकडे ठेवा.
बालआसन हे एक 'रिलॅक्सिंग' आसन आहे जे पाठीला आराम देते. नात बसा आणि हळूच पुढे झुकून कपाळ जमिनीला टेकवा. हात समोरच्या बाजूला सरळ ठेवा.
पाठीवर उताणे झोपा आणि पाय गुडघ्यात दुमडा. आता हळूहळू कंबर आणि पाठ वर उचला. हात जमिनीवर सरळ ठेवा किंवा टाचांना पकडा.