Manasvi Choudhary
ओठ चेहर्याचे सौंदर्य वाढवतात. मात्र, कॅफिनचे अतिरिक्त सेवन, धूम्रपान या समस्येमुळे ओठ काळे पडतात.
ओठांचा काळेपणा घालवण्यासाठी महागड्या केमिकलयुक्त उत्पादनांचा वापर केल्याने ओठांना इजा होऊ शकते.
तुम्ही घरगुती काही उपाय केल्याने ओठांवरील काळेपणा नैसर्गिकरित्या कमी करू शकता.
ओठांना मध लावल्याने ओलावा टिकून राहतो. लिंबामधील नैसर्गिक घटक ओठांवरील काळेपणा कमी करतात.
गुलाबाच्या पाकळ्या ओठांना लावल्याने नैसर्गिक गुलाबी रंग येतो. दुधात गुलाबाच्या मिसळून तुम्ही ती पेस्ट ओठांना लावा.
ओठांना ऑलिव्ह ऑईल लावल्याने ओठांवरील मृत त्वचा निघून जाते आणि ओठ मऊ होतात.
बीटाचा रस ओठांना नैसर्गिकरित्या गुलाबी करतात. रात्री झोपण्यापूर्वी ओठांना बीटरूटचा रस करून लावल्याने ओठ गुलाबी होतील.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.