Manasvi Choudhary
खरा साडीचा लूक हा ब्लाऊजमुळे असतो. एकदा ब्लाऊज चुकला की महागड्या साडीचा लूक पूर्ण खराब होतो.
यासाठी नवीन ब्लाऊज शिवताना व्यवस्थित लक्ष देणे महत्वाचे आहे. ब्लाऊज शिवताना कोणत्या चुका करू नये ते या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.
ब्लाऊज शिवताना योग्य साईजचे माप देणे आवश्यक आहे. तुम्ही चुकीची साईज दिल्यास फिटिंग कधीच नीट येत नाही.
कधीकधी आपण ट्रेंड पाहून खूप मोठा गळा किंवा खूप आखूड बाह्या निवडतो, पण त्या आपल्या शरीराच्या ठेवणीला शोभतीलच असे नाही.
टेलरला आर्महोलचे माप नीट घ्यायला सांगा आणि तिथे हलकीशी मोकळीक ठेवा यामुळे आकार कमी जास्त करता येतो.
काठपदर साडीचा ब्लाऊज आणि नेटच्या साडीच्या ब्लाऊजचे माप कधीही सारखे नसते हे लक्षात घ्या.
भविष्यात शरीरात होणाऱ्या बदलांमुळे ब्लाऊज घट्ट होऊ शकतो. यासाठी ब्लाऊजच्या आत मार्जिन ठेवायला सांगा