Manasvi Choudhary
चेहऱ्यावर पार्लरसारखा 'इन्स्टंट ग्लो' मिळवण्यासाठी महागड्या फेशिअलची गरज नाही. किचनमधील काही पदार्थापासून मिळेल इंस्टंट ग्लो येईल .
कच्चा दुधामध्ये तुम्ही मध मिक्स करून ते कापसाच्या बोळ्याने चेहऱ्यावर लावा आणि १० मिनिटांनी चेहरा धुवा
बेसन, दही आणि चिमूटभर हळद एकत्र करून पेस्ट बनवा. हा पॅक चेहऱ्याला लावून १५-२० मिनिटे सुकू द्या. नंतर कोमट पाण्याने हलक्या हाताने चोळून चेहरा धुवा.
कॉफी पावडरमध्ये अर्धा चमचा साखर आणि थोडे खोबरेल तेल किंवा कोरफड जेल मिसळा. या मिश्रणाने चेहऱ्यावर २-३ मिनिटे हलक्या हाताने मसाज करा.
तुमच्या त्वचेला काही अलर्जी असेल, तर आधी हातावर 'पॅच टेस्ट' करून पहा.
फेशिअल केल्यानंतर किमान ६-८ तास चेहऱ्यावर साबण किंवा फेस वॉश वापरू नका.
घरगुती फेशिअलच्या दिवशी भरपूर पाणी प्या, ज्यामुळे त्वचा आतून हायड्रेटेड दिसेल.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.