Manasvi Choudhary
होळी हा सण आज सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.
होळीच्या दिवशी एकमेकांना रंग लावतात.
गोड पदार्थ होळीच्या दिवशी खास बनवले जातात.
या दिवसाला थंडाई, भांग पिण्याची मज्जा काही वेगळीच असते.
होळीला अनेकजण थंडाईमध्ये भांग मिक्स करून पितात.
होळीला भांगच्या नशेपासून मुक्त होण्यासाठी काय उपाय करावे जाणून घ्या.
भांगची नशा २ ते ३ तास असते.
भांगच्या नशेत असल्यानंतर व्यक्ती शुद्धीत राहत नाही त्याचे नियंत्रण राहत नाही.
भांगच्या नशेतून मुक्त होण्यासाठी लिंबू, दही, चिंच आंबट पदार्थाचे सेवन करा.
भांगची नशा उतरवण्यासाठी तूप खा.
नारळाचे पाणी प्यायल्याने भांगची नशी उतरते.