Manasvi Choudhary
बाजारातील केमिकल उपयुक्त उत्पादनांनी चेहऱ्यावर काळे डाग येतात यासाठी चेहऱ्यावर घरगुती कोणत्या गोष्टी लावाव्यात हे जाणून घ्या.
आयुर्वेदानुसार काही घरगुती उपाय केल्यावर चेहऱ्याचे सौंदर्य कायम राहते. चेहरा ताजेतवाने होतो.
तांदळाचे पाणी चेहऱ्यासाठी फायद्याचे आहे. तुम्ही तांदूळ धुवून ते अर्धा तास भिजत ठेवा आणि ते पाणी स्प्रे बॉटलमध्ये भरून टोनर म्हणून लावा.
दुधात लॅक्टिक ॲसिड असते, जे डेड स्किन काढून टाकते. रोज रात्री झोपण्यापूर्वी कापसाच्या बोळ्याने कच्चं दूध चेहऱ्याला लावा आणि १० मिनिटांनी धुवून टाका.
मध त्वचेला मॉइश्चराइज करते, तर लिंबू नैसर्गिक ब्लीचचे काम करते. १ चमचा मध आणि २-३ थेंब लिंबाचा रस एकत्र करून चेहऱ्याला लावा. १५ मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा.Homemade Skin care Tips
चेहऱ्यावरील टॅनिंग काढण्यासाठी कॉफी उत्तम आहे. १ चमचा कॉफी पावडर आणि १ चमचा दही एकत्र करून हलक्या हाताने मसाज करा.
ताजी कोरफड जेल आणि गुलाब पाणी एकत्र करून रात्री झोपताना लावा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.