Manasvi Choudhary
लांब केस असावेत अशी प्रत्येक महिलेची इच्छा असते. यासाठी मुली व महिला अनेक उपाय करतात मात्र काही फरक दिसत नाही.
केस वाढवण्यासाठी केवळ महागडे शॅम्पू आणि तेल महत्वाचे नाही तर तुम्ही केसांची काळजी कश्या पद्धतीने घेता ते देखील महत्वाचे आहे.
केस लवकर वाढण्यासाठी आणि ते निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही घरगुती सोपे उपाय करा.
आठवड्यातून २ ते ३ वेळा बोटांनी टाळूला हलक्या हाताने मसाज करा. यामुळे डोक्याच्या त्वचेचे रक्ताभिसरण सुधारते आणि केसांच्या मुळांना पोषण मिळते.
केसांना नैसर्गिकरित्या पोषण मिळण्यासाठी आठवड्यातून एकदा घरगुती हेअर मास्क लावा.
केस धुण्यापूर्वी १० ते १५ मिनिटे आधी केसांना तेल लावा आणि नंतर केस धुवा. केस धुण्यासाठी अतिगरम पाण्याचा वापर करू नका. कोमट पाण्याने केस धुवा.
दर ३ महिन्यांनी केस कापा यामुळे केस दाट दिसतात आणि केसांची नैसर्गिकरित्या वाढ होते.
केसांसाठी केमिकलयुक्त उत्पादनांचा वापर करणे टाळा यामुळे केसांचा पोत खराब होतो.