Manasvi Choudhary
आषाढी एकादशी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. आषाढी एकादशीनिमित्त तुम्हीदेखील हिरवी साडी नेसणार असाल तर काही लेटेस्ट ब्लाऊज डिझाईन्स या वेबस्टोरीतून पाहूयात.
लग्नानंतर हिरवी साडी परिधान करणं अत्यंत शुभ मानलं जातं. सणासुदीला हिरवी साडी नेसली की महिलाचं सौंदर्य आणखी खुलून येतं.
हिरव्या साडीवर तुम्ही सिम्पल लूकमध्ये बॅकला दोरी स्टाईल ब्लाऊज पॅटर्न निवडा. तुमचा लूक एकदम भारी दिसेल.
सध्या पफ स्लीव्हज ब्लाऊजचा ट्रेंड आहे. आषाढी वारीच्या परंपरेशी जुळणारा हा लूक हिरव्या साडीवर तुम्ही ट्राय करू शकता.
जर तुम्हाला मॉडर्न आणि स्टायलिश लूक तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ब्लाऊजला बॅकलेस डिझाईनमध्ये बो डिझाइन द्या.
ब्लाऊजचा पुढचा भाग साधा ठेवून पाठीमागच्या भागावर 'यू' किंवा 'व्ही' शेपचा गळा ठेवून त्यावर सुंदर लटकन डिझाईन द्या.
तुम्हाला बँकलेस आवडत नसेल पण डिझाईन हवी असेल तर तुम्ही ब्लाऊजच्या बॅकला क्रॉस दोरी डिझाईन करा.
NEXT: Sprout Benefits: उकडलेले कडधान्य कधी खाल्ले आहे का? चमत्कारी फायदे वाचाल तर आताच खायला सुरूवात कराल