Manasvi Choudhary
चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणण्यासाठी तुम्ही घरीच काही सोपे उपाय करू शकता.
नियमितपणे चेहऱ्याची योग्य काळजी घेतल्याने तुमची त्वचा चमकू लागते. चेहऱ्यावर ग्लो येतो.
चेहऱ्यावर धूळ साचलेली असते अशावेळी रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुणे अत्यंत महत्वाचे आहे. चेहरा दुधाने धुतल्याने त्वचा स्वच्छ होते.
तांदळाचे पीठ, मध किंवा साखर आणि कॉफी हे मिश्रण एकत्रित करून चेहऱ्यावर स्क्रबिंग करा. यामुळे चेहऱ्याचे रक्ताभिसरण सुधारते.
ताजे कोरफडे जेल चेहऱ्याला लावून हलके मसाज करा यामुळे त्वचा मऊ आणि चमकदार दिसेल.
बाहेर जाण्यापूर्वी किमान 15 मिनिटे आधी सनस्क्रीन लावल्यास त्याचा अधिक प्रभावी परिणाम होतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.