Sakshi Sunil Jadhav
तुमचा चालू फोन नंबर जर मोबाईलच्या सिम कार्डला लिंक असेल तर ही बातमी वाचा.
तुम्ही घर बसल्या तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत हे तपासून घ्या.
तुमचा फोन चोरी झाला असल्यास तुम्ही या वेबसाईटवरून तुमचा नंबर ब्लॉक सुद्धा करू शकता.
तुमचा मोबाईल कोणत्या ठिकाणी आहे हे ट्रेक करण्यासाठी IMEI यातील नो युवर मोबाईल कनेक्शन या फीचरचा वापर करून माहिती मिळवू शकता.
सगळ्यात आधी Sanchar Saathi या सरकारी डिजिलट वेबसाईटला भेट द्या.
'Citizen Centric Services' सेक्शनवर जा.
पुढे नो युवर मोबाईल कनेक्शन वर क्लिक करा. त्यामध्ये नंबर, ओटीपी आणि कॅप्चा टाका आणि सबमिट करा.
आता स्क्रीनवर रजिस्टर सिम कार्डची यादी येईल. तुमचे ते सिम नसेल तर तुम्ही ‘Not My Number’ करून सबमिट करा आणि सुरक्षित राहा.