Shruti Vilas Kadam
खोटं बोलणारी व्यक्ती बहुधा तुमच्याकडे सरळ न पाहता नजर चुकवते किंवा वारंवार इतरत्र पाहते.
हातांना जागा न सापडणे, चेहऱ्यावरून हात फिरवणे, घाम येणे, मान वळवणे या हालचाली खोटं बोलताना अधिक दिसतात.
खरे बोलणारा पटकन उत्तर देतो. पण खोटं बोलणारा उत्तर देण्यापूर्वी थोडा वेळ घेतो, शब्द चुकवतो किंवा वाक्य गोंधळलेली असतात.
खोटं बोलताना हास्य, आश्चर्य किंवा दु:ख अशा भावना चेहऱ्यावर कृत्रिमपणे दिसतात – त्या मनापासून नसतात.
आवाज खोटं बोलताना थोडा कापरा, थोडा उंच किंवा कमी होतो. कधी कधी घसा कोरडा पडल्यासारखाही वाटतो.
खोटं बोलणारी व्यक्ती मुद्दा स्पष्ट करण्याऐवजी जास्त गोष्टी सांगते, जणू काही खात्री पटवायची धडपड करत असते.
एखादं उत्तर पुन्हा विचारल्यावर जर वेगळं सांगितलं जात असेल, तर ती शक्यता खोटेपणाची असते.