Manasvi Choudhary
आजकाल अनेकजण कपडे पहिले घालून बघतात आणि नंतर खरेदी करतात. परफेक्ट साईज आणि फिटिंग यासाठी ट्रायल कपडे खरेदी करण्याचा कल वाढला आहे.
मात्र, अनेकदा चेंजिंग रूममध्ये कपडे बदलताना येथे कुठे छुपा कॅमेरा तर नसेल ना? अशी भीती मनात निर्माण होते.
जर तुम्हालाही चेंजिंग रूम वापरताना असा संशय येत असेल, तर सावधगिरी बाळगणे अत्यंत महत्वाचे आहे. कपडे ट्राय करण्यापूर्वी चेंजिंग रूममध्ये छुपा कॅमेरा आहे की नाही शोधण्याच्या सोप्या टिप्स जाणून घ्या.
ट्रायल रूममध्ये कपडे अडकवण्यासाठी भिंतीवर किंवा दरवाजाच्या मागे हुक असतात ते तपासा. आजकाल बाजारात हुकच्या आकारात छोटे हिडन कॅमेरे येतात, त्यामुळे हुकमध्ये कुठे लहान छिद्र किंवा लेन्स दिसते का ते नक्की पाहा.
चेंजिंग रूममधील स्विच बोर्ड, सॉकेट्स, भिंतीवरील घड्याळ, स्मोक डिटेक्टर, लाईट्स आणि पंखे नीट तपासून घ्या.
आरशात छुपा कॅमेरा आहे की नाही हे ओळखण्यासाठी आरशावर 'फिंगरनेल टेस्ट' करा. तुमची बोट आरशाच्या काचावर ठेवा. जर तुमच्या बोटात आणि आरशातील प्रतिबिंब यांच्यात अजिबात जागा नसेल, तर तो 'टू-वे मिरर' असू शकतो. टू वे मिरर मधून प्रतिबिंब दिसते हे लक्षात घ्या.
चेंजिंग रूमची लाईट पूर्णपणे बंद करा आणि अंधार करा. त्यानंतर तुमच्या मोबाईलची फ्लॅशलाईट चालू करून सॉकेट, हुक, स्मोक डिटेक्टर या जागा तपासा. जर तिथे कुठे कॅमेरा असेल, तर कॅमेऱ्याची लेन्स प्रकाशात चमकेल.