Ruchika Jadhav
उन्हाळा किंवा पावसाळयात अनेक ठिकाणी गढूळ पाणी येतं.
राज्यात सध्या मोठा दुष्काळ पसरला आहे. अशा वातावरणात दोन घोट पाण्यासाठी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
काही ठिकाणी जलाशय कोरडेकाठ पडलेत.
विहीरींच्या पाणीपातळीने पार तळ गाठला आहे.
अशात गावात खेड्यापाड्यात हंडाभर पाणी मिळते मात्र तेही गढूळ असते.
त्यामुळे घरच्याघरी असं पाणी स्वच्छ करण्यासाठी पाणी आधी छान उकळवून घ्या.
पाण्याला उकळी आल्यानंतर एका सफेद रंगाच्या सुती कापडात तुम्ही हे पाणी गाळून घेऊ शकता.
पाणी गाळून घेतल्यावर त्यावर तुरटी फिरवा. त्याने पाणी स्वच्छ होतं.
गावात खेड्यापाड्यात फिल्टरशिवाय अशा पद्धातीने गढूळ पाणी स्वच्छ करता येतं.