Surabhi Jayashree Jagdish
१ मे ते १५ मे २०२६ या काळात नागरिकांना स्व-गणना करता येणार आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे ऐच्छिक ठेवण्यात आली आहे. ज्यांना सोयीचं वाटेल त्यांनी ऑनलाइन पद्धतीने माहिती भरू शकतात.
स्व-गणना करण्यासाठी फक्त se.census.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा. हीच अधिकृत आणि सुरक्षित वेबसाइट आहे. इतर कोणत्याही लिंकवरून माहिती भरणं टाळावं.
एका कुटुंबासाठी फक्त एकच अर्ज भरता येईल. अर्जात एकूण ३३ प्रश्नांची माहिती द्यावी लागणार आहे. ही सर्व माहिती अचूक आणि पूर्णपणे भरावी लागणार आहे.
स्व-गणनेसाठी कोणतीही कागदपत्रं अपलोड करावी लागत नाहीत. ही प्रक्रिया सोपी आणि कागदपत्रांशिवाय ठेवण्यात आली आहे. म्हणून नागरिकांना अतिरिक्त त्रास होणार नाही.
माहिती भरल्यानंतर ११ अंकी युनिक आयडी मिळेल. हा आयडी भविष्यातील पडताळणीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तो सुरक्षितपणे जतन करून ठेवणं आवश्यक आहे.
१६ मे ते १४ जून २०२६ दरम्यान अधिकारी घरोघरी भेट देतील. स्व-गणना केलेल्यांची आणि न केलेल्यांची पडताळणी केली जाणार आहे. स्व-गणना केलेल्यांनी त्यांचा युनिक आयडी दाखवावा लागेल.
फक्त अधिकृत वेबसाइटवरच माहिती भरावी. संशयास्पद लिंक, एसएमएस किंवा ई-मेलपासून दूर राहावं. वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी नेहमी सतर्क राहणं गरजेचं आहे.