Instagram Game: कोणत्याही अ‍ॅपशिवाय इन्स्टाग्रामवर खेळा फ्रिमध्ये गेम, वापरा 'या' ट्रिक्स

Dhanshri Shintre

सोशल मिडिया

सध्या बहुतांश लोक मनोरंजनासाठी सोशल मिडियाचा वापर मोठ्या प्रमाणात करत असून तेथे खूप सक्रिय असतात.

इन्स्टाग्राम

इन्स्टाग्राम आजचं अत्यंत लोकप्रिय अ‍ॅप असून, केवळ रील्स नाही तर विविध फीचर्समुळेही लोक त्याला प्राधान्य देतात.

इन्स्टाग्रामचे यूजर्स

2025 मध्ये इन्स्टाग्रामचे जगभरात 2 अब्जांहून अधिक यूजर्स आहेत, तर भारतात 414 दशलक्षाहून अधिक लोक वापरतात.

मोफत गेम्स

मित्र आणि कुटुंबाशी संपर्कात राहता येतोच, शिवाय कंटाळा आल्यानंतर मोफत गेम्स खेळण्याचाही आनंद घेता येतो.

फी लागणार नाही

इन्स्टाग्रामवर गेम खेळताना कोणतीही फी लागणार नाही, कारण हे फीचरस यूजर्ससाठी पूर्णपणे मोफत उपलब्ध आहे.

पायरी १

इन्स्टाग्रामवर गेम खेळणं खूप सोपं आहे. फक्त अ‍ॅप उघडा आणि तुमच्या मित्राच्या चॅट सेक्शनमध्ये प्रवेश करा, एवढंच पुरेसं आहे.

पायरी २

चॅट उघडल्यानंतर, तुम्हाला फक्त एक इमोजी निवडून पाठवायचा आहे.

पायरी ३

इमोजी पाठवून काही सेकंद तो दाबा, इतकं केल्यावर तुम्ही थेट गेमच्या इंटरफेसमध्ये म्हणजेच गेममध्ये प्रवेश कराल.

NEXT: युजर्ससाठी खुशखबर! इन्स्टाग्रामवर लवकरच ऑटो रील स्क्रोल फीचर येणार? कसे करणार काम

येथे क्लिक करा