ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
महागड्या कपड्यांचा रंग टिकवून ठेवण्यासाठी, ते ड्राय क्लीन केले जातात, जे नियमित कपडे धुण्यापेक्षा थोडे महाग असते. पण, तुम्ही काही सोप्या टिप्सने घरी कपडे ड्राय क्लीन करू शकता.
कपडे ड्राय क्लीन करण्याआधी, त्यावरील लेबल नीट वाचावे. कपडे खराब होऊ नये म्हणून लेबलवर दिलेल्या सूचनांचे पालन करावे.
बाजारामध्ये उपलब्ध असलेला होम ड्राय क्लिनिंग किटचा वापर करावा. त्या किटमध्ये स्टेन रिमूव्हर, ड्राय क्लीनिंग शीट्स आणि एक बॅग असते. कपड्यांना बॅगेत टाकून ड्रायरमध्ये कमी तापमान सेट करुन फिरवा.
लहान डाग धब्यांसाठी स्पॉट क्लिनिंग करा. एका साफ कपड्यावर हलके डिटर्जेंट लावून डागांवर घासून घ्या. हट्टी डागांसाठी बेकिंग सोडा आणि पाण्याची पेस्ट बनवा आणि ती कपड्यांवर लावा.
कपड्यांना फ्रेशनेस देण्यासाठी आणि चुरगळ्या निट करण्यासाठी स्टिमरचा उपयोग करावा. स्टिम बॅक्टेरिया आणि दुर्गंध घालविण्यासाठी मदत करते.
सूट किंवा कोटसारख्या कपड्यांवरील धूळ आणि घाण काढण्यासाठी मऊ ब्रश किंवा लिंट रोलरचा वापरा.
बेकिंग सोडा कपड्यांमधील वास दूर करण्यासाठी बेकिंग सोडा बॅगचा वापर करावा. कपडे बेकिंग सोडा असलेल्या बंद बॅगमध्ये काही तासांसाठी ठेवा. यामुळे वास शोषला जाईल.
ड्राय क्लीनिंग केल्यानंतर, कपडे प्रकाशात किंवा हवेशीर ठिकाणी लटकवून ठेवा जेणेकरून कपडे पूर्णपणे फ्रेश राहतील.