Manasvi Choudhary
मंगळवार हा दिवस हनुमानजींना समर्पित आहे. मंगळवारी हनुमानाची पूजा केल्याने तुमच्या इच्छा- आकांक्षा पूर्ण होतील.
ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळवार हा मंगळ ग्रहाचा दिवस आहे. कुंडलीत मंगळ कमकुवत असल्यास किंवा त्याचे नकारात्मक परिणाम होत असल्यास, मंगळवारी त्याची पूजा करावी.
मंगळवारच्या पूजेत लाल रंगाचा वापर करणे आणि लाल रंगाची वस्त्रे परिधान करणे शुभ असते.
मंगळवारच्या दिवशी हनुमानाची पूजा केल्याने बळ, बुद्धी आणि संकटांपासून मुक्ती मिळेल.
मंगळवारी सकाळी किंवा संध्याकाळी हनुमान चालीसा पठण करा.
हनुमानजींना सिंदूर अर्पण करून 'जय श्री राम' मंत्राचा जप केल्यास शारीरिक आणि मानसिक शक्ती वाढते.
मंगळवारी लाल रंगाच्या वस्तू गरजूंना दान केल्यास मंगळ ग्रहाचे दोष दूर होतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.