Saam Tv
तुमचे केस खूप कोरडे पडले असतील तर तुम्ही घरच्या घरीच त्यांना मऊ आणि चमकदार बनवू शकता.
हेअर स्पा केल्याने तुमच्या केसांना आवश्यक पोषण मिळतं. तसेच केस हायड्रेटेड होतात.
पुढे आपण हेअर स्पा घरच्या घरी आणि कमी पैशात कसा करायचा याच्या सोप्या टिप्स शेअर करणार आहोत.
सगळ्यात आधी केस शॅम्पूने धुवून घ्या. तसेच ते सुकवू नका.
आता तुमच्या वापरातल्या तेलाला गरम करा आणि स्कॅल्पला ५ ते १० मिनिटे मसाज करा.
आता केसांना जाड टॉवेलने गुंडाळून ठेवा. त्याने केसांना स्टीम मिळेल. तुम्ही हेअर स्टीमरचा वापर करू शकता.
थोड्या वेळाने तुमचे केस सल्फेट - फ्री शॅम्पूने धुवा. जो तुम्हाला मेडीकलमध्ये सहज मिळेल.
केस थंड पाण्याने धुवा. आता केसांना हेअर मास्क लावा. त्याऐवजी तुम्ही अंड, मध, केळं, एलोवेरा जेल, नारळाचे दूध हे एकत्र करून १५ मिनिटे लावून ठेवू शकता.
पुन्हा मास्क थंड पाण्याने धुवून घ्या. चला तयार आहेत तुमचे सुंदर केस.