Shreya Maskar
पब्लिक स्वच्छतागृह, मॉलमधील वॉशरूम, हॉटेल, ट्रायल रूम किंवा इतर खासगी जागांचा वापर करताना महिलांनी स्वतःच्या प्रायव्हसीची जागरूक राहणे महत्त्वाचे आहे. काही ठिकाणी छुपे कॅमेरे लावले जाण्याचा धोका असू शकतो, ते कसे ओळखावे जाणून घेऊयात.
भिंती, छत, दरवाजाजवळ, व्हेंटिलेशन ग्रिल आणि आरशाच्या आसपास अनोळखी छोटे इलेक्ट्रॉनिक उपकरण, छिद्र, अनावश्यकपणे बसवलेली वस्तू दिसते का ते पाहा.
साबणाच्या डब्याजवळ, टिश्यू डिस्पेंसर, हुक, इतर वस्तूंमध्ये असामान्य लहान गोल छिद्र किंवा चमकणारा भाग दिसल्यास सावध व्हा.
सुरक्षित अंतरावरून संशयास्पद वस्तूकडे प्रकाश टाकल्यास काही लेन्सवर चमक दिसू शकते. असे आढळल्यास कॅमेरा आहे की नाही ते तपासा.
आरसा व्यवस्थित बसवला आहे का, त्याच्या कडा किंवा मागील बाजूस असामान्य उपकरण दिसते का ते पाहा.
काही ॲप्स नेटवर्कशी जोडलेली उपकरणे शोधण्याचा प्रयत्न करतात; मात्र ते सर्व कॅमेरे शोधू शकत नाहीत. नेटवर्कला जोडलेला नसलेला किंवा वेगळ्या पद्धतीने डेटा साठवणारा कॅमेरा त्यातून सुटू शकतो.
संशयास्पद वस्तू दिसल्यास तपासण्यासाठी वेळ घालवू नका. शक्य असल्यास दुसरे स्वच्छतागृह वापरा आणि विश्वासू व्यक्तीला कळवा.
स्वतः उपकरण उघडू नका, तोडू नका किंवा काढू नका. सुरक्षित ठिकाणी जाऊन व्यवस्थापन आणि पोलिसांना माहिती द्या.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.