ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आजच्या डिजिटल युगात, आपण केलेले जवळजवळ प्रत्येक ऑनलाइन सर्च गुगलच्या सर्चवर सेव्ह केले जाते.
गुगल आपला पर्सनल डेटा Ads आणि Personalization करिता वापरतो, म्हणून कधीकधी आपल्याला वाटतं की आपण गुगलवरून आपला डेटा डिलीट करावा.अशा परिस्थितीत, गुगलवरील तुमचा डेटा कसा डिलीट करायचा ते जाणून घ्या
सर्वप्रथम , तुमच्या गुगल अकाउंटमध्ये लॉग इन करा.
My Activity Page वर जा आणि https://myactivity.google.com/ वर जावून तुमचा संपूर्ण अॅक्टिव्हिटी डेटा पाहा.
Delete activity by सिलेक्ट करा त्यानंतर येथून तुम्ही महिन्याभरातील संपूर्ण डेटा डिलीट करू शकता.
सोबतच Search History Delete करु शकता. Web & App Activity सेक्शनमध्ये जावून Search History काढून टाकू शकता.
यानंतर location History मध्ये जावून तुमचा जुना लोकेशन डेटा डिलीट करा.