Sakshi Sunil Jadhav
तुम्ही मोबाईलमध्ये आत्तापर्यंत डाउनलोड केलेल्या ॲपमध्ये तुमचा सगळा डेटा सेव्ह असतो.
जेव्हा तुम्ही एखादे ॲप घेता तेव्हा सुरुवातीलाच तुम्हाला सगळ्या परवानग्या मागितल्या जातात.
त्याने तुमचे खाते सुद्धा रिकामे होऊ शकते. म्हणून तुम्ही पुढील पद्धतींचा वापर करून यापासून लांब राहू शकता.
तुमच्या मोबाईलमध्ये सेटिंग्समध्ये जाऊन गुगलवर टॅप करा.
पुढे ऑल सर्व्हिसेसवर क्लिक करा. तिथे तुम्हाला सगळा डेटा मिळेल.
तिथे तुम्हाला डिलीट केलेले ॲप दिसल्यास क्लिक करा.
पुढे डिलीट ऑल कनेक्शन वर क्लिक करा आणि Confirm वर क्लिक करा.
हीच प्रक्रिया तुम्हाला सगळ्या ॲपसाठी पाहायची आहे.