Siddhi Hande
अनेकदा लहान मुलांना चटपटीत खायला आवडतं. अशावेळी तुम्ही छान दही पुरी बनवू शकतात.
दहीपुरी बनवण्यासाठी बटाटे, पाणीपुरीची पुरी, दही, जिरं पावडर, चाट मसाला, कांदा, हिरवी चटणी, गोड चटणी, शेव आणि कोथिंबीर
सर्वात आधी तुम्हाला बटाटे उकडायचे आहेत. यानंतर बटाटे मॅश करुन घ्यायचे आहेत.
यानंतर पुदीना, हिरवी मिरची आणि कोथिंबीरीची चटणी बनवून घ्या. त्यात थोडा चाट मसाला आणि मीठ टाका.
याचसोबत एका बाजूला चिंचेचा गर काढून त्याची गोड चटणी बनवा.
एका डिशमध्ये पुऱ्या घ्या. त्याला छिद्र करा.
या एकेक पुरीत उकडलेला बटाटा, चिरलेला कांदा, हिरवी चटणी आणि चिंचेंची चटणी टाका.
यानंतर त्यावर फेटलेले दही टाका. त्यावर काळे मीठ, जिरं पावडर आणि चाट मसाला टाका.
यावर मस्त शेव आणि कोथिंबीर टाकून गार्निश करा.