Manasvi Choudhary
स्वयंपाकघरात भाजी बनवताना कांदा कापणे हे त्रासदायक असते कारण कांदा कापताना डोळ्यांची जळजळ होणे आणि डोळ्यांतून पाणी येणे या समस्या उद्भवतात.
कांद्यामध्ये नैसर्गिकरित्या 'सल्फर' युक्त ॲसिड असते. जेव्हा तुम्ही सुरीने कांदा कापता, तेव्हा कांद्याच्या अंतर्गत पेशी तुटतात आणि त्यातील सल्फरयुक्त वायू हवेत पसरतो. हा वायू जेव्हा आपल्या डोळ्यांतील पापण्यांच्या संपर्कात येतो, तेव्हा त्याचे रूपांतर एका सौम्य ॲसिडमध्ये होते. हे ॲसिड डोळ्यांना झोंबते आणि त्यामुळे डोळ्यांची तीव्र जळजळ होते.
मात्र तुम्हाला माहितीये का? काही सोप्या ट्रिक्स वापरल्या तर कांदा कापताना डोळ्यातून पाणी येणार नाही.
कांदा कापताना एका लहान भांड्यात किंवा वाटीत स्वच्छ पाणी भरून ठेवा.
कांदा कापताना जो सल्फरयुक्त वायू बाहेर पडतो, तो हवेत पसरून तुमच्या डोळ्यांपर्यंत पोहोचण्याआधी शेजारी ठेवलेल्या पाण्यात वेगाने विरघळतो. यामुळे डोळे जळजळत नाही.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.