Manasvi Choudhary
नखे हा शरीराचा अत्यंत संवेदनशील भाग असतो यामुळे नखे कापताना योग्य काळजी घेणे महत्वाचे आहे.
नखे कापण्यापूर्वी हात-पाय ५ मिनिटे कोमट पाण्यात भिजवा किंवा आंघोळीनंतर लगेच नखे कापा. यामुळे नखे मऊ होतात आणि सहज कापली जातात.
नखे कापताना कात्री किंवा चाकू वापरू नका चांगल्या नेलकटरचा वापर करा.
हाताची नखे कापताना ती नैसर्गिक वळणानुसार योग्य कापावी
नखे त्वचेच्या अगदी जवळून किंवा खूप आतपर्यंत कापू नका. यामुळे नखांच्या खालची नाजूक त्वचा दुखते
नखे कापल्यानंतर त्याच्या कडा टोकदार राहतात. त्या 'नेल फायलर'ने गुळगुळीत करा.