Manasvi Choudhary
पाणी हे मानवी जीवनासाठी अत्यंत महत्वाचे आहे. शरीराचे वजन, हवामान आणि तुमची शारीरिक हालचाल यावर पाण्याचे प्रमाण अवलंबून असते.
निरोगी राहण्यासाठी संपूर्ण दिवसात किती पाणी प्यावे? हे जाणून घ्या आरोग्य तज्ज्ञांच्या मते प्रत्येकाच्या शरीरानुसार पाणी पिणे योग्य ठरेल.
मुलांनी दिवसाला कमीत कमी 1 ते 1.3 लिटर पाणी प्यावे. तसेच दूध, सूप, फळांचा रस यामधूनही पाण्याची गरज पूर्ण होते. वारंवार थोडेथोडे पाणी द्यावे.
महिलांनी 2.3 ते 2.5 लिटर आणि पुरुषांनी 2.8 ते 3 लिटर पाणी पिणे योग्य ठरते.
ज्येष्ठांनी दिवसाला 2 ते 2.5 लिटर पाणी प्यावे. या वयात तहान कमी लागू शकते म्हणून वेळोवेळी थोडेथोडे पाणी पिण्याची सवय लावावी.
सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी १-२ ग्लास कोमट पाणी पिणे पचनासाठी उत्तम असते.
तहान लागणे हे शरीरातील पाणी कमी झाल्याचे पहिले लक्षण आहे.
जेवणापूर्वी ३० मिनिटे आधी पाणी प्यावे. जेवताना खूप पाणी पिणे टाळावे, कारण त्यामुळे पचनशक्ती मंदावते.