Saam Tv
लहान बाळांना सर्दी-खोकला झाल्यास दरवेळी औषध देणे अयोग्य ठरू शकते.
नवजात बाळाला सर्दी झाल्यास तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. त्याने बाळाला कोणतीही हानी पोहोचणार नाही.
थोडा ओवा तव्यावर भाजून एका रुमालात बांधून बाळाला त्याचा शेक द्यावा.
ओव्याची पोटली बांधून शेकवा व ती फार गरम असताना शेकवू नका.
ओवा आणि लसूण साजूक तुपात गरम करून गाळा. ते मिश्रण थंड झाल्यावर बाळाच्या छातीवर, तळपायावर मालिश करा.
सौम्य कोमट फडका कपाळावर व नाकावर ठेवा.
बाळाच्या खोलीत जास्त कोरडी हवा येऊ देऊ नका.
थोडी हळद गरम करून तुपात मिसळा. हे मिश्रण पाठीवर हलक्या हाताने मालिश करा.