ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे फोन जास्त प्रमाणात गरम होतो. फोन जेव्हा गरम होतो तेव्हा त्याची चार्जिंग लवकर संपते.
काही सिंपल ट्रिक्सचा वापर करुन तुम्ही मोबाईल ओव्हरहिटिंग कमी करु शकता.
मोबाईल वापरताना गरम होत असेल तर मोबाईल लवकर खराब होऊ शकतो.
जर तुम्ही रखरखत्या उन्हात मोबाईल चार्ज करण्यासाठी फास्ट चार्जिंग वापरात असाल तर यामुळे बॅटरी लवकर खराब होते.
उन्हाळ्यामध्ये मोबाईल फोन कव्हर शिवाय वापरा. यामुळे मोबाईल गरम होणार नाही.
उन्हाळ्यात मोबाईल जास्त वेळ खिशात ठेवू नका. अन्यथा मोबाईल गरम होऊ शकतो.
उन्हाळ्यात बाहेर मोबाईल वापरताना सूर्यप्रकाशापासून दूर ठेवून वापरा.