Rice Cooking Tips: भात चिकट होऊ नये म्हणून काय करायचं? वाचा एकदम सोपी ट्रिक

Sakshi Sunil Jadhav

भात बनवण्याची पद्धत

बऱ्याचदा आपल्या घरात कुकरमध्ये भात तयार केला जातो. कारण तो ३ शिट्ट्यांमध्ये लगेचच तयार होतो. पण भात त्यामध्ये चिकट होत असतो.

how to cook rice properly

भात का चिकट होतो?

भातामध्ये असलेला एमायलोपेक्टिन स्टार्च गरम पाण्यात मिसळल्यावर भातातला चिकटपणा वाढतो. जास्त पाणी वापरल्यामुळे हा चिकटपणा आणखी वाढतो.

how to cook rice properly

भात नीट धुवा

भात शिजवण्यापूर्वी 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवा. याने जास्तीचा स्टार्च निघून जातो आणि भात मोकळा होतो.

perfect rice cooking

एकदाच धुण्याची चूक टाळा

अनेकजण भात फक्त एकदाच धुतात, जे चुकीचं आहे. असं केल्यावर भात चिकट आणि गुळगुळीत होतो.

perfect rice cooking

पाण्याचे प्रमाण योग्य ठेवा

1 कप बासमती तांदळासाठी दीड कप पाणी पुरेसं असतं. जास्त पाणी घेतल्यावर भात मऊ किंवा जास्त चिकट होतो.

perfect rice cooking

मीडियम फ्लेमचा वापर

भात नेहमी मध्यम आचेवर शिजवा. जास्त आचेवर शिजवल्यामुळे तो भात खराब होतो किंवा कच्चा राहू शकतो.

perfect rice cooking

कुकरच्या 3 शिट्ट्या पुरेशा

भात शिजवताना 3 शिट्ट्या झाल्यावर लगेच गॅस बंद करा. जास्त शिट्ट्या झाल्यावर भात चिकट होतो किंवा करपतो.

Rice Cooking Tips | yandex

शिजल्यानंतर लगेच उघडू नका

कुकर थंड होईपर्यंत वाट बघा. यामुळे तांदळाचे दाणे व्यवस्थित सेट होतात.

Rice Cooking Tips | yandex

चांगले तांदूळ निवडा

बासमती तांदूळ वापरल्यावर भात जास्त मोकळा-मोकळा बनतो. जुने तांदूळ तुम्ही खाऊ शकता.

Rice Cooking

NEXT: Airoli Tourism : फॅमिली फ्रेंड्ससोबत फिरण्यासाठी ऐरोलीजवळ आहेत ही 8 सीक्रेट ठिकाणं

Airoli Tourism | google
येथे क्लिक करा