Manasvi Choudhary
अनेकजण कुकरमध्ये भात बनवतात, पण कुकरमध्ये भात शिजवताना पाणी किती घ्यावे याचे प्रमाण अनेक महिलांना नसते.
यासाठी आज आम्ही कुकरमध्ये सुटसुटीत, मोकळा भात शिजवण्याच्या ५ सोप्या टिप्स सांगणार आहोत.
भात शिजवण्यापूर्वी तांदूळ २ ते ३ वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.
भातातील पाण्याचे प्रमाण महत्वाचे आहे. साधारणपणे १ वाटी तांदळासाठी २ वाटी पाणी हे प्रमाण योग्य ठरते.
तुमच्याकडे वेळ असेल, तर तांदूळ धुवून १० ते १५ मिनिटे भिजत ठेवा. यामुळे भात लवकर शिजतो.
भात सुटसुटीत आणि मोकळा व्हावा यासाठी कुकर लावताना त्यात अर्धा चमचा तेल किंवा तूप घाला.
कुकरच्या ३ शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करा. पण कुकर लगेच उघडू नका. कुकरमधील वाफ पूर्णपणे झाल्यावर कुकरचे झाकण उघडा.