Saam Tv
वारंवार जुलाब होत असतील तर तुम्ही काही घरगुती सोपे उपाय फॉलो करून लगेचच आराम मिळवू शकता. हे उपाय पुढील प्रमाणे आहेत.
वारंवार होणाऱ्या शौचामुळे शरीरातील पाणी कमी होते. यामुळे भरपूर पाणी, नारळ पाणी किंवा O.R.S. घ्या.
आल्याचा रस 1 चमचा मधासोबत घेण्याने पचन सुधारते.
घरचं अन्न खा, जसे की भात-खिचडी, पोहे, केळी, सफरचंद, दही इत्यादी.
तुपात जीरे भाजून घ्या आणि ते कोमट पाण्यात मिसळून प्या. यामुळे पचन सुधारते.
धणे पूड आणि साखर कोमट पाण्यात मिसळून घ्या. हे डायरिया कमी होऊ शकतो.
दूषित पाणी आणि अन्न टाळा. स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या.