Saam Tv
लहान मुलांना योग्य वयात योग्य सवयी लावणं खूप महत्वाचं असतं. नाहीतर त्याचा वाईट परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो.
वाढत्या वयात मुलांच्या खाण्यापिण्याच्या सवयी कशा असाव्या हे त्यांचे पालकचं ठरवू शकतात. अशा वेळेस पुढील मुद्दे लक्षात घेणं खूप फायद्याचं ठरू शकतं.
उठल्याउठल्या लहान मुलांना बिस्किटं आणि चहा देऊ नका. चहा व बिस्किटं पचनासाठी हानिकारक असतात. त्याऐवजी गरम दूध किंवा भिजवलेले बदाम हा चांगला पर्याय आहे.
पाव, खारी, टोस्ट यासारखे पदार्थ लहान मुलांना देणे टाळा. जर तुम्ही स्वतः हे पदार्थ खाणं बंद केलं, तर मुलंही मागणार नाहीत.
मॅगी, पिझ्झा, बर्गर यासारखे पदार्थ मुलांना देऊ नका. बाहेरचं फास्टफूड आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं.
जास्त तेलकट व तळलेले पदार्थ टाळा. अशा पदार्थांमुळे लठ्ठपणा व पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
मुलांच्या आरोग्याची पहिली शाळा घरच आहे. लहानपणापासूनच मुलांची सवय आरोग्यदायी बनवा. यामुळे तुमचं मूल आनंदी आणि निरोगी राहील.