Saam Tv
आपल्या cravings ना आपण नियंत्रणात ठेवू शकत नाहीत. आपल्याला एखाद्या पदार्थाची चव आली की, आपण लगेच तो विकत घेवून खातो. मात्र त्याने आपल्याला पोटासंबंधीत अनेक समस्या उद्भवू शकतात.
या समस्येचा विचार करुन काही टिप्स तुम्हाला शेअर करणार आहोत, त्या पुढील प्रमाणे आहेत.
तुम्हाला जेव्हा क्रेविंग्स होतात तेव्हा तुम्हाला बाहेर विकत मिळणाऱ्या खाद्यपदार्थांची चव येते. अशा वेळेस तुम्ही चांगले चांगले पदार्थ घरी तयार करुन खावू शकता.
दररोज किमान 7-8 ग्लास पाणी प्या. त्याने तुमच्या शरीरात लाळेचे प्रमाण योग्य कमी पडणार नाही.
तुम्ही जेवणात प्रथिने,फायबरचा समावेश केल्याने तुम्हाला जास्त भूक लागत नाही आणि पोटभरलेले राहते.
जेवणाचा आस्वाद घेताना आपल्या खाण्याकडे लक्ष द्या. त्याने तुम्हाला इतर पदार्थ आठवणार नाहीत.
तुम्हाला सतत पाणी प्यायला आवडत नसेल तर तुम्ही फळांचे सेवन करु शकता. त्याने तुमच्या शरीराची तहान भागू शकते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
NEXT: प्रवासात तुम्हाला पण मळमळ किंवा उलटीचा त्रास होतोय? करा 'हे' सोपे उपाय....