ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मधुमेह ही एक गंभीर समस्या आहे. एकदा एखाद्याला मधुमेह झाला की, निरोगी जीवनशैलीने त्यावर नियंत्रण ठेवणे खूप महत्वाचे आहे.
जेवणानंतर १५-२० मिनिटे चालल्याने रक्तातील साखर लवकर कमी होण्यास मदत होते. त्यामुळे इन्सुलिनची क्रिया वाढते आणि शरीरात ग्लुकोजचे उर्जेमध्ये जलद रूपांतर होते.
दिवसभर पुरेसे पाणी पिणे महत्वाचे आहे. पाणी शरीरातील अतिरिक्त ग्लुकोज बाहेर काढण्यास मदत करते. ज्यामुळे साखरेची पातळी स्थिर राहते.
सतत तणावात राहिल्याने ब्लड शुगर लेव्हल अचानक वाढते. ध्यान, प्राणायम किंवा दीर्घ श्वास घेतल्याने ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते.
जर ब्लड शुगर लेव्हल जास्त असेल तर जास्त कार्ब्स असलेले पदार्थ खाऊ नका. याऐवजी, सॅलेड, नट्स किंवा सीड्स सारखे हेल्दी स्नॅक्स खा.
जर ब्लड शुगर लेव्हल अचानक लो झाली तर ज्यूस , ग्लुकोज टॅबलेट किंवा मध खा.
ग्लुकोमीटरचा वापर करुन नियमित रक्तातील साखरेची पाचतळी चेक करा. जर ब्लड शुगर सतत हाय किंवा लो होत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.