ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
केक चविष्ट असतो परंतु जास्त प्रमाणात केक खाल्ल्यास आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
केकमध्ये साखर आणि कॅलरीज खूप जास्त असतात. दररोज किंवा जास्त प्रमाणात केक खाल्ल्याने वजन वाढू शकते आणि लठ्ठपणाचा धोका वाढू शकतो.
केकमधील साखर आणि स्टार्च दातांना चिकटतात. त्यामुळे पोकळी, दातदुखी आणि हिरड्यांच्या समस्या उद्भवू शकतात.
केक खाल्ल्याने ब्लड शुगर लेव्हल अचानक वाढू शकते. मधुमेह असलेल्या लोकांसाठी केक खाणं हानिकारक ठरु शकतं.
जास्त केक खाल्ल्याने पोटात गॅस, अॅसिडिटी आणि अपचन यासारख्या समस्या उद्भवू शकतात. याशिवाय मेटाबॉलिजम रेट देखील मंदावू शकतो.
केकमध्ये भरपूर बटर आणि ट्रान्स फॅट असते. जास्त प्रमाणात खाल्ल्याने कोलेस्टेरॉल वाढते, जे हृदयाला हानी पोहोचवू शकते.
जास्त गोड पदार्थ खाल्ल्याने पिंपल्स आणि पुरळ येऊ शकतात. त्वचेची चमक कमी होते आणि निस्तेजपणा वाढू शकतो.