Saam Tv
राग हा ठिकाण किंवा मुहूर्त बघून येत नाही. तो कुठेही आणि कोणावरही येऊ शकतो.
तुम्ही जर तुमच्या रागावर नियंत्रण मिळवलं नाहीत तर तुम्हाला त्याचा खूप पश्चाताप भोगावा लागू शकतो.
कधी कधी तुमच्या कामातल्या व्यक्तींवर सुद्धा खूप राग येऊ शकतो. पण तो राग व्यक्त करण्याआधी चाणक्यांची धोरणे समजून घ्या.
कारण रागाने नाती तुटतात, तसेच राग हा काही वेळापुर्ताच असतो. त्यामुळे त्यावर नियंत्रण मिळवणं खूप गरजेचे असते.
चाणक्यांच्या मते तुम्हाला कोणाच्या बोलण्याचा फार राग येत असेल. तर त्यांच्याशी राग शांत झाल्यावर बोला. लगेचच बोलू नका.
तुम्हाला प्रचंड राग आला असेल तर एकट्याने शांत वातावरणात जावून १० मिनिटे चाला. तसेच झाडांच्या परिसरात चाला.
कामात नेहमी एकमेकांचा राग येत असतोच. अशा वेळेस तुम्ही १०० पासून १ पर्यंतचे उलटे आकडे मोजा. ही एक मजेशीर गंमत तुमचा मुड फ्रेश करेल.
रागात आपण मार झोड किंवा शिवी गाळ करू शकतो. त्यामुळे असे चुकीचे पाऊल उचलण्याआधी तुम्ही शांत होणं गरजेचं आहे. त्यासाठी त्वरित संगीत ऐकल्याने तुम्हाला फायदा होईल.