Doodh Malai Trick: घरात भरपूर तूप निघेल! दुधावर जाड साय जमवण्याचा सर्वात सोपा घरगुती उपाय

Sakshi Sunil Jadhav

दूध जास्त वेळ उकळू नका

दूध सतत खळखळ उकळत ठेवण्याऐवजी ते वर येऊ लागताच गॅस बंद करा. यामुळे दुधातील नैसर्गिक मलईचा थर चांगल्या प्रकारे तयार होण्यास मदत होते.

Doodh Malai Trick

झाकण ठेवू नका

दूधावर लगेच घट्ट झाकण किंवा ताटली ठेवण्याची चूक टाळा. वाफ पुन्हा दुधात गेल्यास मलई पातळ होण्याची शक्यता वाढते.

Thick Milk Cream Tips

दूध उघडे ठेवा

गॅस बंद केल्यानंतर दूध साधारण एक तास तसेच राहू द्या. माशा किंवा किड्यांपासून संरक्षणासाठी जाळीदार झाकण वापरू शकता.

Thick Milk Cream Tips

अर्धवट झाका

एका तासानंतर वर हलकी मलई दिसू लागल्यास भांडे अर्धवट झाकून ठेवा. यामुळे उष्णता हळूहळू कमी होते आणि मलई व्यवस्थित बसते.

Homemade Ghee

दूध थंड करा

दूध खोलीच्या तापमानावर नैसर्गिकरीत्या थंड होणे महत्त्वाचे आहे. घाईत फ्रिजमध्ये ठेवल्यास अपेक्षित जाड मलई तयार होणार नाही.

Milk Cream Hacks

लक्षात ठेवा

दूध थंड झाल्यानंतर त्यात चमचा घालणे किंवा दूध काढणे टाळा. असे केल्यास तयार झालेला मलईचा थर तुटू शकतो.

Milk Cream Hacks

रात्रभर फ्रिजमध्ये ठेवा

भांडे काळजीपूर्वक उचलून थेट फ्रिजमध्ये ठेवा आणि रात्रभर तसेच राहू द्या. यामुळे मलई अधिक घट्ट, जाड आणि कडक तयार होते.

Kitchen Tips

मलई काढण्याची पद्धत

सकाळी सुरीने मलईचे कडे हलक्या हाताने वेगळे करा. यामुळे मलई न तुटता एकसंध आणि जाड थराच्या स्वरूपात बाहेर येते.

Kitchen Tips

होणारा फायदा

दूध जास्त वेळ गॅसवर ठेवावे लागत नसल्याने गॅसची बचत होते. तसेच जास्त जाड मलई मिळाल्यामुळे साजूक तूप आणि लोणीही जास्त प्रमाणात तयार करता येते.

Kitchen Tips

NEXT : घर बदलंय तर LPG कनेक्शन ट्रान्सफर कसं होणार? जाणून घ्या 5 नियम नाहीतर कनेक्शन होईल बंद

LPG Connection | google
येथे क्लिक करा