Diwali Photo Tips: दिवाळीत फोटो कसे क्लिक करावे? प्रोफेशनल लुकसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स

Dhanshri Shintre

लाईटवर फोकस करा

फोटोमध्ये अधिक उठावासाठी दिवा चेहऱ्याच्या समोरील बाजूस ठेवा, प्रकाशाचा योग्य वापर फोटोला आकर्षक आणि चमकदार बनवतो.

प्रकाशाचा वापर

फोटो अधिक सुंदर आणि स्पष्ट दिसण्यासाठी नैसर्गिक प्रकाशाचा वापर करा, दिवसाच्या प्रकाशात काढलेले फोटो आकर्षक आणि नैसर्गिक दिसतात.

पोट्रेट मोड वापरा

या टिपमुळे बॅकग्राऊंड मऊ होईल आणि फोटोमध्ये तुमच्या चेहऱ्यावर लक्ष केंद्रीत राहील, ज्यामुळे अधिक प्रोफेशनल लुक मिळतो.

कोणत्या रंगाचे कपडे

दिवाळीच्या प्रकाशात पांढरे, क्रीम आणि पेस्टल रंगाचे कपडे अधिक आकर्षक दिसतात, जे फोटो आणि लुक दोन्ही सुधारतात.

ट्रायपॉड वापरा

या पद्धतीमुळे फोटो स्थिर राहतो आणि त्याचा लुक अधिक आकर्षक दिसतो, ज्यामुळे क्लिक केलेले फोटो प्रोफेशनल प्रमाणे तयार होतात.

लेन्स स्वच्छ ठेवा

फोटो क्लिक करताना कॅमेराचा लेन्स स्वच्छ ठेवा; यामुळे फोटो स्पष्ट, चमकदार आणि धूसरपणापासून मुक्त दिसतो.

एडीटिंग करा

फोटोवर खूप एडीटिंग केल्यास तो नैसर्गिक न वाटता फेक दिसतो, त्यामुळे नेहमी हलकी एडीटिंग करा.

NEXT: दिवाळीत पाळीव प्राण्यांची कशी काळजी घ्यावी? वाचा 'या' स्मार्ट टिप्स वापरा

येथे क्लिक करा