Dhanshri Shintre
फटाक्यांचा मोठा आवाज ऐकून पाळीव प्राणी घाबरतात, अस्वस्थ होतात आणि सुरक्षित ठिकाणी लपून बसतात.
प्राणी लपल्यास त्यांना तिथेच शांत सोडा, खिडक्या बंद करून पडदे लावा, त्यामुळे फटाक्यांचा आवाज कमी जाणवतो.
प्राण्यांना गोड किंवा तळलेले पदार्थ देऊ नयेत, कारण ते त्यांच्या आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकतात.
फटाक्यांचा आवाज आणि धूर टाळण्यासाठी खिडक्या-दरवाजे बंद ठेवा आणि फटाके प्राण्यांपासून शक्य तितक्या दूर फोडा.
फटाक्यांच्या आवाजात प्राण्यांना एकटे ठेवू नका, त्यांच्यासोबत राहा; तुमच्या उपस्थितीने त्यांची घबराट आणि भीती कमी होते.
फटाक्यांचा आवाज ऐकून प्राणी घाबरल्यास त्यांच्यासाठी स्वच्छ पाण्याची व्यवस्था करा, त्यामुळे त्यांना शांत वाटेल.
प्राण्यांना मिठाईपासून दूर ठेवा, कारण ती त्यांच्यासाठी घातक ठरू शकते; त्याऐवजी सुरक्षित पद्धतीने सण साजरा करा.