Dhanshri Shintre
दररोज चष्मा नीट स्वच्छ करणे आवश्यक आहे, ज्यामुळे तो दीर्घकाळ नवीन राहतो आणि लेन्सवर खुणा पडत नाहीत.
सुरुवातीला हात स्वच्छ धुवा, नंतर लोशन-फ्री साबण किंवा डिशवॉशिंग लिक्विड वापरा, आणि लिंट-फ्री टॉवेलने कोरडे करा.
चष्मा हलक्या वाहत्या पाण्यात स्वच्छ धुवा, धुळ आणि घाण निघेल; गरम पाण्याचा वापर टाळा, लेन्सची कोटींग खराब होऊ शकते.
प्रत्येक लेन्सवर पाण्याचा एक थेंब टाका आणि बोटाने सावधगिरीने पसरवा, नेहमी लोशन-फ्री लिक्विड वापरणे आवश्यक आहे.
दोन्ही लेन्स सावकाश स्वच्छ करा, नोज पॅड्स व टॅपल्स नीट रगडा, त्यानंतर लेन्स व फ्रेमच्या सांध्यावरील घाण काढा.
चष्म्याला सावकाश हलका झटका द्या, पाणी बाहेर जाईल, नंतर लेन्स पूर्णपणे स्वच्छ झाली आहे की नाही, तपासून पाहा.
स्वच्छ, लिंट-फ्री टॉवेल वापरा, फॅब्रिक सॉफ्टनर टाळा आणि लेन्स साफ करण्यासाठी मायक्रोफायबर कपडा सर्वोत्तम आहे.